श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
अध्यक्षपदी तेजस गांधी तर सचिवपदी केतन दोशी यांची बिनविरोध निवड
भूमीपुत्र न्यूज
सामाजिक , सांस्कृतिक व मुख्यत्वे करून जैन समाज बांधवांसाठी कार्य करणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा निवडीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

यामध्ये माळशिरस तालुक्यातील बोंडले येथील तेजस प्रितम गांधी यांची अध्यक्षपदी तर अकलूजचे केतन राजकुमार दोशी यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.अकलूज येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्षपदी महावीर दोशी (नातेपुते), सहसचिव पदी संदीप शहा (अकलूज), खजिनदार पदी प्रशांत दोशी (फलटण), सह खजिनदार पदी कपील गांधी (अकलूज) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी विरकुमार दोशी,जिनेंद्र दोशी, निनाद चंकेश्वरा,नवजीवन दोशी,नमन गांधी, संदीप शहा, सत्यजित दोशी,योगेश गांधी,अभिजित दोभाडा,विरेंद्र दोभाडा, प्रदीप झाडे,मयुर गांधी, संकेत गांधी,मेघराज गांधी, अजिंक्य फडे आदी सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी यांनी प्रास्ताविक करताना, संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.तसेच अरिहंत,देव,गुरू,शास्त्र यांच्या साक्षीने संस्थेचे कार्य मनापासून करून तन मन धनाने सर्व कार्यात सहभागी होऊन जैन धर्माची प्रभावना करण्याची नूतन संचालकांना शपथ दिली.तर मावळते अध्यक्ष अभिजित दोभाडा यांनी सन २०२५-२६ या वर्षात केलेल्या कार्याचा आढावा वाचून दाखवला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिनेंद्र दोशी यांनी केले तर आभार विरकुमार दोशी यांनी मानले.
सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याबरोबरच आत्तापर्यंत सात जिल्ह्यात असलेले संस्थेचे कार्य यापुढे अजून विस्तारण्याचे काम केले जाईल.तसेच अध्यक्ष निवडीत पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला जाईल.
नुतन अध्यक्ष – तेजस प्रितम गांधी




