भारतीय दलित संसद, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी सोमनाथ खंडागळे

भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्र राज्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ पांडुरंग खंडागळे यांची भारतीय दलित संसद, महाराष्ट्रच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. अंबादास सगट यांनी खंडागळे यांना दिले.
सोमनाथ खंडागळे हे अकलूज येथील रहिवासी असून ते पत्रकारितेबरोबरच सामाजीक क्षेत्रात काम करीत असून त्यांची चळवळीप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक व संवैधानिक न्यायाच्या चळवळीत निष्ठेने केलेल्या कार्याची दखल घेत या पदावर नियुक्ती करण्यात आली.
भारतीय दलित संसदचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अंबादास सगट, कार्याध्यक्ष प्रा.बी.डी.खोतकर,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी विशाल उमाप यांनी टाकलेला विश्वास व दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडणार.
सोमनाथ खंडागळे ,नूतन कार्याध्यक्ष




