महाराष्ट्रवैद्यकीयशैक्षणिकसामाजिकसोलापूर जिल्हा

नर्सिंग सेवा पुण्य कर्म : पालकमंत्री गोरे महाराष्ट्र परिचर्या परिषद व पिंक रेव्होल्यूशन संस्थेच्या वतीने कार्यशाळा

भूमीपुत्र न्यूज

अकलूज/शाहरुख मुलाणी

डॉक्टर केवळ उपचार देतात, परंतु परिचारीका उदात्त हेतूने रुग्णसेवा करतात. नर्सिंग सेवा पुण्य कर्म आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.महाराष्ट्र परिचर्या परिषद व पिंक रेव्होल्यूशन संस्थेच्या वतीने अकलूज येथे परिचारिकांसाठी आयोजित कर्करोग निरंतर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी डॉ. मनोहर इनामदार, डॉ. सतीश दोशी, पिंक रीवोल्युशनच्या अध्यक्षा व संयोजिका डॉ. श्रद्धा जवंजाळ, जलतज्ञ अनिल पाटील, डॉ. राहुल जवंजाळ, सचिन शिंदे, महादेव कावळे, राहुल लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले, कोविड काळात काही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले. मात्र परिचारिकांनी आपल्या जीवावर उदार होऊन रुग्णाची सेवा केली. परिचारिका रुग्णाला देत असलेली सेवा इतर कोणीही देऊ शकत नाही. अशा नर्सिंग सेवा देणाऱ्या परिचारिकांसाठीच्या या कार्यशाळेचा लाभ घेत रुग्णांना चांगली सेवा द्यावी.

प्रास्ताविकात संयोजिका डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी महाराष्ट्र परिचर्या परिषद संलग्नीत दहा पॉईंट क्रेडीटेड पिंक रेव्होल्यूशन आयोजित निरंतर कार्यशाळेमध्ये व्यापक कर्करोग जागरूकता, लवकर निदान, व्यवस्थापन, पुनर्बाधणी, पोषण आणि पुनर्वसन यावर मार्गदर्शन होणार असल्याचे सांगितले.

डॉ सतीश दोशी यावेळी बोलताना म्हणाले परिचारिका ह्या डॉक्टरांच्या यशस्वीतेतील महत्त्वाचा भाग आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण हा कर्करोगापेक्षात्याच्या भीतीनेच मरतो. कर्करोग होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे असून आनंदी जीवन जगणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. प्रदूषण वाढल्याने अनेक आजारांचे प्रमाणही वाढत आहे.

प्रत्येक डॉक्टरांच्या यशात नर्सेसचा वाटा महत्त्वाचा आहे. कर्करोगाबाबत जाणीव जागृती व्हावी याबाबत डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी हा जो उपक्रम राबवलेला कौतुकास्पद असल्याचे डॉ. एम. के. इनामदार यांनी सांगितले. डॉ.विद्याचंद्रजी गांधी उपस्थिती राहुल मार्गदर्शन लाभले. सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय व प्रायव्हेट नर्सेस यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला यासाठी मार्गदर्शन कॅन्सर सारख्या बलाढ्या आजारावर ही CNE आणि घेण्यात आली होती त्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ.मनीषा शिंदे श्री नितीन इंगळे विजय डॉ. विजया कुंभार डॉ.विजय विजया कुंभार डॉ. होता श्री विजय महाजनी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला पिंक रेवोल्युशन तर्फे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी माही जवंजाळ व मंगेश चंदनशिवे यांनी पार पाडले व विशेष सहकार्य भालेराव सिस्टर शासकीय रुग्णालय अकलूज यांचे लाभले.

सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय व प्रायव्हेट नर्सेस यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला यासाठी मार्गदर्शन कॅन्सर सारख्या बलाढ्या आजारावर ही CNE आणि घेण्यात आली होती त्यासाठी मार्गदर्शक म्हणून रुबी हॉल क्लिनिक पुणे येथील डॉ विद्याचंद्र गांधी डॉ.मनीषा शिंदे श्री नितीन इंगळे विजय डॉ. विजया कुंभार डॉ.विजय विजया कुंभार डॉ. होता श्री विजय महाजनी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंचा पिंक रेवोल्युशन च्या वतीने सन्मान करण्यात आला . त्याचबरोबर सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचा ही शपथविधी लॅम्प लाइटिंग सेरेमनी पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!