माळशिरस तालुकासामाजिक

निमगाव येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

शिवप्रेमी तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम

भूमीपुत्र न्यूज

कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छ. शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त निमगाव ता माळशिरस येथे शिवप्रेमी तरूण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते सन 2023 च्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात शिबिरात 51 दात्यांनी रक्तदान केले.

प्रारंभी शिबिराचे उद्घाटन छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास स म शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब मगर, जिल्हा नियोजन समिती सदस्य के.के.पाटील,सरपंच सुभाष साठे,उपसरपंच नंदकुमार पाटील,माजी सरपंच हनुमंत पवार ,श्रीमंत मगर,अध्यक्ष लक्ष्मण पवार,मयूर माने,किरण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून शिबिराची सुरूवात करण्यात आली.

शनिवार दि.18 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत हे शिबिर पार पडले.शिबिरासाठी अकलूज येथील शंकरराव मोहीते पाटील ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.शिबिर यशस्वितेसाठी अध्यक्ष लक्ष्मण पवार,राणोजी मगर,विजय मगर,महादेव मगर,कुंडलिक मगर,दत्तात्रय पवार,सुदर्शन पवार, यश मगर आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!