माळशिरस तालुका

मैत्री प्रतिष्ठानने अनोखी जिजाऊ जयंती साजरी करीत केले वृक्ष वाटप व कोरोना महामारी काम केलेल्या माता भगिनींचा केला सन्मान

भूमीपुत्र न्यूज

राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब यांची 425 वी जयंती मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने गिरझणी चौक,बायपास रोड,अकलूज येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी वृक्ष वाटप करण्यात आले. याचबरोबर कोरोना सारख्या महामारीत काम करणाऱ्या माता भगिनींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या अनोख्या जिजाऊ जयंतीचे जयंतीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

कार्यक्रमासाठी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे,अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे ,ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब गायकवाड, अकलूज पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाच्या प्रमुख नाजमीन तांबोळी ,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष किरण धाईंजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी जगदाळे, युवा सेना अकलूज प्रमुख शेखर खिलारे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अकलूज शहर प्रमुख शैला गोसावी ,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते झूलकर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख सुरेश गंभीरे, सह्याद्री प्रतिष्ठान अकलूजचे अध्यक्ष विकी बोर्डे व सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी मैत्री प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!