महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील

भूमीपुत्र न्यूज
“जीवात जीवमान असेपर्यंत जनसेवाच करू” हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी युवा नेते डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची सोमवारी सायंकाळी सर्वानुमते निवड करण्यात आली .
सन 1975 साली स म शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात जनसेवा संघटनेचे स्थापना केली होती या संघटनेची धुरा लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील हे यशस्वीपणे सांभाळत होते. राज्यातील राजकारणातील व समाजकारणातील बदल लक्षात घेऊन लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सन 1998 साली या संघटनेच्या नावात बदल करून महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना असे नामकरण केले व संघटनेचे जाळे सर्वदूर राज्यभर पसरले गेले. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविले गेले यात प्रामुख्याने जिल्हाभर बांधण्यात येणारे बंधारे व रक्तदान शिबिर याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या व वडील लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी समाजकारणाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचविलेल्या जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था , नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत जनसेवा संघटनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




