मराठा समन्वयक धनाजी साखळकर यांना मातृशोक…

विज वाहतूक करणाऱ्या पोलला स्पर्श झाल्याने निर्मला साखळकर यांचे निधन…
भूमीपुत्र न्यूज
चौंडेश्वरवाडी ता माळशिरस येथील निर्मला बाळासाहेब साखळकर यांचे आपल्या शेतातील वीज वाहतूक करणाऱ्या पोलला हाताचा स्पर्श झाल्याने सोमवार दि 25 ऑगस्ट2025 रोजी सायंकाळी 7.00 वा अकलूज येथील डॉ एम के इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 60 वर्षे इतके होते याबाबतची रीतसर तक्रार मयत निर्मला साखळकर यांचे पुतणे सचिन साखळकर यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी धनाजी साखरकर यांच्या मातोश्री निर्मला साखळकर या सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराशेजारील शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता आपल्या शेतात असणाऱ्या वीज वाहतूक करणाऱ्या पोल शेजारून जात असताना त्यांच्या हाताचा स्पर्श वीज वाहतूक करणाऱ्या पोलला झाल्याने त्या ठिकाणी त्या बेशुद्ध होऊन पडल्या घरातील लोकांनी त्या शेतात नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी गेले असल्याने लगेच चौकशी केली नाही परंतु तास ते दोन तास झाल्यानंतर त्या परत का आल्या नाहीत याबाबत त्यांनी चौकशी सुरू केली असता सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या आपल्या शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या.
तात्काळ त्यांना अकलूज येथील डॉ एम के इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचविता आले नाही अखेर सोमवारी सायंकाळी 7 वा सुमारास डॉ इनामदार यांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पती बाळासाहेब साखळकर ,दोन मुले धनाजी साखळकर व नितीन साखळकर, सुना नातवंडे असा परिवार आहे साखळकर आणि परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळ आहे त्यांना त्यातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना भूमीपुत्र न्यूज आणि परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली




