माळशिरस तालुकाराजकिय

चांदापुरीच्या उपसरपंच पदी तात्यासाहेब चोरमले बिनविरोध

भूमीपुत्र न्यूज /रशीद शेख

चांदापुरी ता माळशिरस ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी तात्यासाहेब चोरमले यांची बिनविरोध निवड झाली असून उपसरपंच निवडीसाठी चांदापुरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बोलविलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोहिते पाटील पॅनलचे नुतन सरपंच जयवंत सुळ होते यावेळी नुतन सदस्य तात्या चोरमले (उपसरपंच ),अजित लोखंडे आपासाहेब शिंदे हनुमंत सरतापे सविता पाटील ,प्रियंका सरक ,दिपाली निकम ,उपस्थित होते.

उपसरपंच निवडीसाठी तात्यासाहेब चोरमले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच म्हणुन निवड करण्यात आली . यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अतुल लेंडवे ,तर सहायक म्हणुन ग्रामविकास अधिकारी श्रीमती एन आर शेख , गाव कामगार तलाठी चव्हाण यांनी काम पाहिले.
यावेळी केशवराव पाटील , शिवाजी चोरमले , विजयसिंह पाटील , आपासाहेब सरतापे , मोहन सरतापे ,जयवंत पुकळे ,मुनीर शेख , आपा पाटील , दत्ता निकम , पांडुरंग लाडे , अजिनाथ जगदाळे , प्रकाश शिंदे , शाहिद शेख , विजय सुळ ,हनुमंत कोपनर , विकी कोळपे ,विजय निकम ,दिलीप सरतापे ,हनुमंत लोखंडे , बापु लोखंडे ,शिवाजी गोरवे , सुभाष सरक , आण्णा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव पोलीस ठाणेचे सतिश धुमाळ ,अभिजीत कणसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!