पत्रकारितामाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

माळशिरस तालुका पत्रकार संघ 2026 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न ,शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणजे पत्रकार / सुनीता पाटील

भूमीपुत्र न्यूज

काम करणारा माणूस चुकत असतो, प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करीत असताना अनावधानाने काही चुका होतात जाणीवपूर्वक चुका होत नाहीत परंतु चुका दाखविण्याचे काम पत्रकार निसंकोचपणे करतात पत्रकार आणि प्रशासन ही दोन चाके आहेत ही जर व्यवस्थित चालली तर निश्चितच समाजाच्या विकासात भर पडेल असे मत अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी व्यक्त केले माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन 2026 च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत त्या बोलत होत्या.

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी सलग पाच वर्षे मोफत सल्लागार म्हणून काम केल्याबद्दल माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभ्यासू व्यक्तिमत्व,जेष्ठ विधीज्ञ आदरणीय ॲड जी पी कदम साहेब यांचा आज तहसील कार्यालय माळशिरस येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मा सुनीता पाटील मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी विचारपीठावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूजचे अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी, श्रीमती ए आर ससाने, सा बां विभाग अधिकारी गोविंद कर्णवर पाटील ,निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, माळशिरस पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे,अकलूज पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, वेळापूर पोलीस स्टेशनचे एपीआय भाऊसाहेब गोसावी, नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय महारुद्र परजने, माळशिरस च्या सहाय्यक दुय्यम निबंधक रूपाली कदम , सहाय्यक,महसूल अधिकारी संदीप कोळेकर,पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेटे,पुरवठा निरीक्षक श्रीमती सुप्रिया वजाळे ,वनविभागाचे धर्मेंद्र सावंत,विजय काळे ,पंचायत समिती बांधकाम विभागाचे इस्माईल मुलाणी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांचा सन्मान माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पत्रकार निनाद पाटील यांनी प्रास्ताविक करून सर्व उपस्थित अधिकारी व मान्यवरांचे स्वागत केले व माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने गेल्या सहा वर्षात आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली यावेळी पीआय विकास दिंडोरे ,पीआय नीरज उबाळे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले ,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, श्रीमती ए आर ससाने, नायब तहसीलदार अमोल कदम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक,लेखक,कवी हनुमंत पवार, सामाजिक कार्यकर्ते गोरख जानकर व अजित बोरकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.उपस्थित अधिकारी वर्गाचा सन्मान माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश माने देशमुख तर आभार निनाद पाटील यांनी मानले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांचा सन्मान करताना पत्रकार संघाचे सचिव उदय कदम
अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांचा सन्मान करताना खजिनदार सतिश पारसे

कार्यक्रमासाठी बाळासाहेब वावरे, दत्ताजीराव मगर,बाळासाहेब सरगर, श्रीनिवास कदम पाटील, जयकुमार केचे पाटील,सचिन गायकवाड, सतीश दडस ,अजिनाथ देशमुख ,बापूसाहेब वाघमोडे ,प्रकाश काशीद आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज राऊत ,उपाध्यक्ष एल डी वाघमोडे ,दिनेश माने देशमुख ,सचिव उदय कदम ,सहसचिव अभिजीत जाधव, खजिनदार सतिश पारसे, निनाद पाटील, विनोद बाबर ,संजय देशमुख, संजय पवार, नितीन मगर,ओंकार आडत, शाहरुख मुलाणी आदी मान्यवर, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांचा सन्मान करताना पत्रकार संजय देशमुख
तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांचा सन्मान करताना पत्रकार संघाचे सहसचिव अभिजीत जाधव

वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण श्रीमती ए आर ससाने यांचा सन्मान करताना पत्रकार विनोद बाबर
पुरवठा निरीक्षक माळशिरस सुप्रिया वजाळे यांचा सन्मान करताना वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण श्रीमती ए आर ससाने
वनविभागाचे अधिकारी विजय काळे यांचा सन्मान करताना पत्रकार संघाचे सचिव उदय कदम
वन विभागाचे अधिकारी धर्मेंद्र सावंत यांचा सन्मान करताना पत्रकार संजय देशमुख
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गोविंद कर्णवर पाटील यांचा सन्मान करताना अध्यक्ष मनोज राऊत
महसूल सहाय्यक अधिकारी संदीप कोळेकर यांचा सन्मान करताना पत्रकार शाहरुख मुलाणी
वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांचा सन्मान करताना पत्रकार निनाद पाटील
माळशिरस च्या सहाय्यक दुय्यम निबंधक रूपाली कदम यांचा सन्मान करताना पत्रकार संजय पवार

माळशिरस पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेटे यांचा सन्मान करताना पत्रकार दिनेश माने देशमुख
माळशिरस तालुका पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲड. जी पी कदम यांचा सन्मान करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील
सामाजिक कार्यकर्ते गोरख जानकर यांचा सन्मान करताना पत्रकार संजय देशमुख
सामाजिक कार्यकर्ते अजित बोरकर यांचा सन्मान करताना पत्रकार संजय देशमुख
ज्येष्ठ साहित्यिक, लेखक कवी हनुमंत पवार यांचा माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या हस्ते सन्मान करताना
सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वावरे यांचा सन्मान करताना पत्रकार दिनेश माने देशमुख
सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समितीचे अधिकारी इस्माईल मुलाणी यांचा सत्कार करताना पत्रकार नितीन मगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!