माळशिरस तालुकाराजकिय

फळवणी गावच्या सर्वांगीण
विकासासाठी निधी देणार/आ राम सातपुते

भूमीपुत्र न्यूज

निवडणुकीत जय पराजय होत असतो परंतु सामाजिक कार्य करत रहाणे, कार्यकर्ता व चळवळ टिकवून ठेवणे आणि त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे हे नेतृत्वाचे काम असते यानुसार एक नेतृत्व म्हणून फळवणी चे माजी सरपंच सचिन पाटील यांनी आतापर्यंत फळवणीच्या सर्वांगीण विकासासाठी सांगितलेली कामे मंजूर केली असून यापुढे ही कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आ राम सातपुते यांनी सांगितले ते फळवणी ता माळशिरस येथे सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सदस्यांच्या व फळवणी ग्रामपंचायतच्या नूतन सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल धैर्यशील मोहिते पाटील व के.के पाटील यांचा सन्मान फळवणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला तर नूतन ग्रामपंचायत सदस्या वर्षाराणी आवताडे, माजी सरपंच सचिन पाटील यांचा तसेच सेवानिवृत्त शिक्षिका मालन सुरवसे यांचा सन्मान आ. राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर,कोळेगांवच्या सरपंच रजनी दुपडे ,उपसरपंच रेश्मा सावंत ,शिवामृत चे संचालक दादासाहेब शिंगाडे, काळमवाडीचे सरपंच भुजंगराव शिंगाडे ,नूतन ग्रामपंचायत सदस्या रानुबाई आवताडे,सतिश आवताडे,मुन्ना आवताडे,योगेश वाघमारे,महादेव आवताडे,युवराज सोनटक्के,अतुल जाधव तसेच फळवणी ,काळमवाडी,कोळेगांव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!