माळशिरस तालुकासामाजिक

निमगाव येथील लेखक हनुमंत पवार यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर

भूमीपुत्र न्यूज

निमगाव ता.माळशिरस येथील लेखक,कवी ,साहित्यिक हनुमंत पवार यांच्या “स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव”या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा सन 2022 चा “रा.ना.नातू स्मृति पारितोषिक” पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असून गेली 117 वर्षे मराठी भाषा साहित्य, समीक्षा , संस्कृती यांचे जतन व संवर्धन करत आहे.परिषदेकडून सन 2022 या वर्षातील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीना सन्मानित करण्यात येणार आहे. निमगाव येथील लेखक हनुमंत पवार यांच्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव या ग्रंथास रा.ना.नातू पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम 26 मे रोजी पुणे येथे होणार असून ज्येष्ठ लेखक रामचंद्र गुहा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे असणार आहेत.प्रा.पवार यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

छ शिवाजी महाराज व छ संभाजी महाराज या दोन्ही छत्रपती समवेत काम केलेले स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे एकमेव सेनापती होते त्यांनी नात्यागोत्यांना महत्त्व न देता वस्तूतिथी जाणून नीतीचा वापर करून आपल्या पराक्रमाची शौर्यगाथा निर्माण तर केलीच याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन महाराष्ट्राचा दबदबा निर्माण केला या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती ती मी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव या पुस्तकांमधून मांडली आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मला मिळाला याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
हनुमंत पवार, लेखक स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!