Uncategorized

भाजपा नगरसेवक महेश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आरएमसी प्लांटला अखेर ब्रेक; स्थलांतराची प्रक्रिया सुरू

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथील प्रभाग क्रमांक ८ मधील कृष्णलीला हॉटेलसमोर लोकवस्तीच्या परिसरात सुरू असलेल्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट उभारणीस स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर सध्या काम बंद करण्यात आले असून संबंधित प्लांट दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकवस्तीमध्ये आरएमसी प्लांट उभारल्यास नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपा नगरसेवक तथा अकलूज शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष महेश शिंदे यांनी, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे तीव्र आक्षेप नोंदवला होता.

अकलूज नगर परिषद, तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्याकडे निवेदने सादर करून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यासंदर्भात शिंदे यांनी सोलापूर येथे जाऊन MPCB उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची भेट घेत तात्काळ कारवाईची मागणी केली होती.निवेदनानंतर आरएमसी प्लांटचे काम बंद असून सदर प्लांट दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरपरिषद, MPCB उपप्रादेशिक अधिकारी तसेच संबंधित प्लांटच्या इंजिनियर यांच्याकडून मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. भविष्यात पुन्हा त्या ठिकाणी प्लांट उभारण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा शिंदे यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!