माळशिरस तालुका

मुकुट चोरला; अकलूज पोलिसांनी चोर दोन तासात पकडला

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथिल राजे पिर बागसवार देवस्थानामध्ये चांदीचा मुकुट व हाताच्या पंजाची चोरी करुन पळालेल्या चोरास अकलूज पोलीसांनी दोन तासात शोधुन काढले व त्याच्याकङुन मुद्देमाल हस्तगत केला.

नुकताच काही दिवसांपूर्वी देवस्थानचा ऊरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यानिमित्त देव सजवण्यात आले होते. या धामधुमीचा फायदा घेत, पुजारी दुपारच्यावेळी जेवायला गेल्याचे पाहुन सुरज विष्णु बंदपट्टे रा. लोणारगल्ली, अकलूज याने गाभा-यात प्रवेश करुन ८०० ग्रॕम वजनाचा चांदीचा मुकुट व २० ग्रॕम वजनाचा हाताचा पंजा चोरुन नेला. देवस्थानचे पुजारी सुनिल लावंङ रा. लुमेवाडी हे देवस्थानी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर चोरीची अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलीसांनी वेळ न दवङता आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाङ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, शिवकुमार मदभावी, जमीर शेख, रणजीत जगताप यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहीती काढुन सुरज बंदपट्टे यास ताब्यात घेतले व त्याच्याकङुन मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार समीर पठाण हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!