माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

श्री गणपती फार्मसीच्या तृप्ती गोसावी व वैष्णवी सुरवसेचा राज्यात तिसरा क्रमांक

भूमीपुत्र न्यूज

मौजे अकोले खुर्द ता माढा येथील श्री गणपती फार्मसी, टेंभूर्णीच्या बी. फार्मसी तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी तृप्ती गोसावी आणि वैष्णवी सुरवसे यांनी फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्तरावरील वैज्ञानिक पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे.

या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधील १४ पोस्टर्सद्वारे २८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यातून श्री गणपती फार्मसीच्या विद्यार्थिनींनी आपले संशोधनात्मक सादरीकरण, सशक्त मांडणी आणि नावीन्यपूर्ण विचारांनी परीक्षकांची मने जिंकली.

प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी सांगितले की, “अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक विकसित होतो.”

या वेळी संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष अॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे, तसेच डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. नामदेव शिंदे, प्रा. शिवराज ढगे आणि प्रा. शैलेश पेंदोर यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेच्या समन्वयक प्रा. सुप्रिया म्हमाणे यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!