महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची प्रशासकीय बदली

प्रशासकीय बदली

भूमीपुत्र न्यूज

आपल्या सिंघम स्टाईलने भल्याभल्यांना कायदा मानायला लावणारे एमपीआयडी, तडीपार, अवैध व्यवसायांचा कर्दनकाळ असणारे वेळापूरचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांची प्रशासकीय बदली सोलापूर ग्रामीण (एलसीबी) स्थानिक गुन्हे शाखेत झाली आहे.

नियमानुसार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला एका पोलीस स्टेशनला दोन वर्षाचा कार्यकाल मिळतो यानुसार 31 मे 2024 रोजी वेळापूर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी हे रुजू झाले होते त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाल 31 जानेवारी 2026 रोजी संपत होता परंतु गुन्हेगारांचा व कायदा मोडणाऱ्यांचा कर्दनकाळ असणारे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना दोन महिने मुदतवाढ दिली होती यानुसार त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांना सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेत रुजू करण्यात आले आहे.

13 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांची झालेली बदली ही प्रशासकीय बदली आहे वेळापूर पोलीस स्टेशनचा आपला दोन वर्षाचा कार्यकाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी कायद्याचा माप दंड लावून सर्व गुन्हेगारांना जेरीस आणले होते त्यामुळे एका चांगल्या व कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!