आरोग्यमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम’ सुरू ;१४ वर्षांच्या मुलींसाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये मोफत लसीकरण

भूमीपुत्र न्यूज

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव येथे सदर मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव येथे ३ लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व रुग्णालयांमध्ये १४ वर्षे पूर्ण पण १५ वर्षांखालील मुलींसाठी एचपीव्ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर मोहीम ही पुढील ३ महिने चालणार आहे.

HPV ही लस सुरक्षित, प्रमाणित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी असल्याने पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.भारत सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ वर्षांच्या मुली (ज्यांनी १४ वा वाढदिवस साजरा केला आहे पण १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत) या एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत. जगभरात एचपीव्ही लसीचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे, सध्या या वयोगटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जेणेकरून १५ वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींना वेळेत संरक्षण मिळू शकेल.•

लसीकरणासाठी अपात्र परिस्थिती खालील परिस्थितींमध्ये एचपीव्ही लसीकरण दिले जाणार नाही किंवा पुढे ढकलले जाईल,

१४ वर्षांच्या लक्ष्य वयोगटाबाहेरील मुली, पूर्वी एचपीव्ही लस (गार्डासिल किंवा सर्वाव्हॅक) घेतलेली असल्यास लस किंवा तिच्या घटकांमुळे (यीस्ट) तीव्र ऍलर्जीचा इतिहास असल्यास मध्यम ते गंभीर आजार असल्यास – पूर्णपणे बरे झाल्यानंतरच लसीकरण करावे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालयात विनामूल्य एचपीव्ही लस दिली जाणार आहेसर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत मोफत लसीकरण सत्र सुरु राहतील. नागरिकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव येथे संपर्क साधून मोफत एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा. तसेच लस घ्यायला येताना आधार, शाळेचे ओळखपत्र ( I card ) तत्सम ओळख पत्र घेऊन आणि भरपेट नाश्ता करून पालकांनी मुलींना घेऊन यावे , असे आवाहन प्राथमिक आरोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे

“महिलांच्या आरोग्याचे संरक्षण ही जिल्हा आरोग्य विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. पिलीव अंतर्गत येणाऱ्या १४ वर्षांच्या मुलींसाठी ही लस मोफत उपलब्ध करून देत आहे. पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून या आरोग्य उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.

”श्रीम.शेवाळे एस पी,आरोग्य साहाय्यिका, प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एचपीव्ही संक्रमण हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण असून, योग्य वयात दिलेली एचपीव्ही लस हा त्याविरुद्धचा प्रभावी उपाय आहे. अंतर्गत येणाऱ्या सर्व मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी ही मोफत लसीकरण मोहीम राबवत आहे.

डॉ अमेय फुले, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव

“एचपीव्ही व्हायरस हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा मुख्य कारणीभूत घटक आहे. योग्य वयात म्हणजे १५ वर्षांपूर्वी दिलेली एचपीव्ही लस मुलींना दीर्घकालीन संरक्षण देते. त्यामुळे पालकांनी १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.”

डॉ. विलास जाधव, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!