कोळेगांव ग्रामपंचायत पोटनिवडणूक साठी शांततेत मतदान;3310 मतदारांनी बजावला हक्क

भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पद पोटनिवडणूकी साठी मंगळवारी मतदान झाले.यामध्ये एकूण 4171 मतदारांपैकी 3310 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

कोळेगांव ता माळशिरस येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी जय बिरोबा ग्राम विकास युती पॅनलच्या अधिकृत उमेदवार सुषमा धनंजय दुपडे यांच्या विरोधात जय बिरोबा ग्राम समृद्धी पॅनलच्या उमेदवार सुनिता अरुण सावंत यांच्यामध्ये लढत झाली असून दोन्ही उमेदवारांनी विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.
तर वार्ड क्रमांक दोन मध्ये सदस्य पदासाठी लागलेल्या पोटनिवडणूकीसाठी ओमराजे किशोर सावंत विरुद्ध सिद्धनाथ मनोहर दुपडे यांच्यामध्ये लढत झाली असून येथेही दोन्ही उमेदवारानी विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.प्रभाग क्रमांक एक मध्ये 674, प्रभाग क्रमांक दोन 650,प्रभाग क्रमांक तीन 600,प्रभाग क्रमांक चार 545 तर प्रभाग क्रमांक पाच येथे 841 मतदारांनी आपला हक्क बजावला.
उद्या बुधवारी माळशिरस येथे मतमोजणी होणार असून यामध्ये सरपंच पदी कोण विजय होणार हे ठरणार आहे.




