शिवसेनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी संतोष राऊत

भूमीपुत्र न्यूज
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)या पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी अकलूज ,राऊत नगर येथील संतोष राऊत यांची निवड करण्यात आली आहे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या आदेशाने नुकत्याच करण्यात आल्या आहेत .
गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या तालुकाध्यक्षपदी अकलूज ,बागेवाडी येथील नामदेव वाघमारे हे काम पाहत होते परंतु त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड केली असल्याचे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आले यामुळे या पक्षाच्या रिक्त झालेल्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी संतोष राऊत यांची नवनियुक्ती झाली आहे तर शिवसेनेचे दत्ता पवार यांची माळशिरस तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याचबरोबर अकलूज शहराध्यक्षपदी अनिल बंदपट्टे यांची निवड करण्यात आली आहे . या सर्व निवडी शनिवार दिनांक 11 फेब्रुवारीच्या दै. सामनातून जाहीर करण्यात आल्या आहेत .
गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेत निष्ठेने काम करीत असून शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या माध्यमातून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अन्नदान, शिवसेना पक्ष वाढीसाठी विविध उपक्रम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबविले आहेत यापुढेही अनेक सामाजिक उपक्रम राबवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणारा असून वरिष्ठांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार
संतोष राऊत, नवनियुक्त माळशिरस तालुका अध्यक्ष शिवसेना




