Uncategorized

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अकलूज येथे छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन

भूमीपुत्र न्यूज

बहुजन प्रतिपालक ,कुळवाडी भूषण छ. शिवाजी महाराज यांच्या 351 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शुक्रवार दि 6 जून रोजी जयशंकर उद्यान,अकलूज येथील छ. शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास राज्याचे मा उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विचारपीठावर विजयसिंह मोहिते पाटील, हिंदुराव माने पाटील ,अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, अकलूज नगर परिषदेचे सीईओ दयानंद गोरे ,अण्णासाहेब शिंदे ,भारत जगदाळे,खुळे ,दळवी,उत्तम शेंडगे,आदी मान्यवर उपस्थित होते.

अकलूज नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जयशंकर उद्यान येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माने पाटील परिवाराच्यावतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी बोलताना अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले की,येत्या वर्षभराच्या कालावधीमध्ये जय शंकर उद्यान याच ठिकाणी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब, छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे खा धैर्यशील मोहिते पाटील व आ रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बसणार आहेत यामुळे बऱ्याच दिवसापासून असणारी सर्वांचीच मागणी पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

उपस्थित मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली कार्यक्रमासाठी बंटी जगताप, निनाद पाटील, बबनराव शेंडगे, सचिन गायकवाड, राजू मिसाळ, जयकुमार केचे पाटील, अनिल कदम, भारत सांगडे, गणेश कदम, डॉ विठ्ठल कोडग ,लालासाहेब पराडे, दत्तात्रेय लावंड, अक्काताई माने, मनोरमा लावंड, शारदा चव्हाण,अकलूज नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!