माळशिरस तालुकाराजकीय

लवंग ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सज्जन दुरापे यांची बिनविरोध निवड

भूमीपुत्र न्यूज

माळशिरस तालुक्यातील लवंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अकलूज चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक व शिवरत्न परिवाराशी एकनिष्ठ असणारे सज्जन दुरापे यांची बिनविरोध निवड झाल्याने लवंग गावामध्ये एकच जल्लोष करण्यात आला.

लवंग चे उपसरपंच प्रशांत बेलारे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त होती.उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालय लवंग येथे पार पडली. सदर निवड प्रक्रियेसाठी लवंग ग्रामपंचायतच्या 13 सदस्यांपैकी 7 सदस्य उपस्थित होते. उपसरपंच या पदासाठी सज्जन दुरापे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सरोदे यांनी उपसरपंच पदी सज्जन दुरापे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.सज्जन दुरपे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर होताच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

निवडीनंतर गटनेते माजी सरपंच निशांत पाटील व गावातील मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच सज्जन दुरापे यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर महाराष्ट्र राज्याचे मा उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे खा धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिवरत्न उद्योग समूहाचे कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील ,लवंग ग्रामपंचायत चे सरपंच प्रशांत पाटील यांनी सज्जन दुरापे यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रशेखर दुरापे, उत्तम भिलारे, उत्तमराव भोसले, विश्वंभर वाघ, दत्तात्रेय चव्हाण,युवराज वाघ, तानाजी रणसिंग,प्रशांत भिलारे, महादेव कोळी, विठ्ठल भोसले,लालासाहेब दुरापे, प्रकाश गायकवाड, माऊली वाघ, गोरख वाघ,जयवंत चव्हाण, सहकार महर्षी कारखान्याचे माजी संचालक धनंजय चव्हाण, राजकुमार पाटील,नितीन वाघ,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!