माळशिरस तालुका
निमगाव चे सरपंच सुभाष साठे यांना मातृशोक, शेषाबाई रामचंद्र साठे यांचे निधन

भूमीपुत्र न्यूज
निमगाव(म) चे सरपंच सुभाष रामचंद्र साठे यांच्या मातोश्री शेषाबाई रामचंद्र साठे यांचे 21 एप्रिल 2023 शुक्रवार पहाटे 5.30 वा वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय हे 85 वर्ष एवढे होते. त्यांच्या पश्चात 5 मुले ,3 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे .
ज्येष्ठ विचारवंत, लेखक ,प्रा मार्तंड साठे यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या पार्थिवावर निमगाव येथील स्मशानभूमीत शुक्रवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 9.00 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या निमगावचे विद्यमान सरपंच सुभाष साठे यांच्या मातोश्री होत्या .
” भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे स्व. शेषाबाई रामचंद्र साठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली “




