निमगाव पंचायत समिती गण: राष्ट्रवादीकडून पै दत्ता मगर यांचे नाव जवळपास निश्चित; तर भाजपाकडून किरण पाटील की डॉ. गोरख मगर ?
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील निमगाव पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था 2026 च्या निवडणुकांसाठी निमगाव पंचायत समिती गण हा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पै दत्तात्रय रावसाहेब मगर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून समर्थकांकडून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

गुरुवार दि.15 रोजी निमगाव येथे निमगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीच्या संदर्भात स म शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब मगर आणि ॲड.लक्ष्मण मगर यांच्या मार्गदर्शनाखाली विचार विनिमय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पै.दत्ता मगर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडे अधिकृतपणे सुचवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने अद्याप आपला उमेदवार अधिकृतपणे जाहीर केलेला नाही.निमगाव गणातून भाजपकडून डॉ.गोरख मगर आणि किरण पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. हे दोन्ही चेहरे प्रभावी असल्याने पक्ष नेमकी कोणाला संधी देणार ? याबाबत मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.सध्या भाजपकडून या दोन्ही नावांची चाचपणी सुरू आहे. आता निमगावच्या या रणसंग्रामात नेमकी कोणा कोणामध्ये लढत होणार येत्या दोन दिवसांत अधिकृतपणे स्पष्ट होईल.
माळशिरस तालुक्यात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विरोधात तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात सुरू आहे जर तिसरी आघाडी झाली तर त्याचा फटका कोणाला बसेल ? तिसरी आघाडी माळशिरस तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गटात व 18 पंचायत समिती गणात आपले उमेदवार देईल याच अनुषंगाने त्या त्या जिल्हा परिषद गटात होत्या त्या त्या पंचायत समिती गणात तिसऱ्या आघाडीचा प्रभाव किती असेल, फायदा व तोटा कोणाला होईल हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निश्चितच समजेल




