माळशिरस तालुका

शिंदेवाडी येथील सस्ते कुटुंबीयांनी वडिलांचा 100 व आईचा 90 वा वाढदिवस केला उत्साहात साजरा

भूमीपुत्र न्यूज

शिंदेवाडी ता.माळशिरस येथील शेतकरी पूञ हनूमंत सस्ते,सदाशिव सस्ते,बाळासो सस्ते,बहीण सूजाता घोलप यांनी वडील गूलाब सस्ते यांचा 100 वा ,व आईचा 90 वा, वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केल्याने या अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र चर्चा होत आहे यावेळी वाढदिवसानिमित्त उपस्थिताना ज्ञानेश्वरी ग्रंथ100 व गीता ग्रंथ 100 भेट देण्यात आले.

या शतकोत्तर व सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे सत्कारमूर्ती गूलाबराव सस्ते यांना यांना 3 मूले,1 मुलगी असा परिवार असो या चारही मुलांना त्यांनी चांगले शिक्षण देऊन स्वताच्या पायावर उभे केले.गूलाबराव सस्ते हे शांत,संयमी व्यक्तिमत्व म्हणून परीसरात परीचीत आहेत विहीरीवरील इंजिन स्वता दूरूस्त करायचे स्वता फिटर व मॅकेनिकलचे काम करायचे सतत सर्वाच्या मदतीला धावून जायचे हा त्याचा स्थायी भाव होता. या कार्यक्रमासाठी आप्तेष्ट नातेवाईक यांच्यासह नरसिंग शिंदे,नंदकुमार शिंदे,
विनोद रणवरे,सुनील शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

वडीलांनी आपार कष्ट करून आम्हा भावंडाना शिक्षण दिले,आम्ही सर्वजण शेतीत वेगळे प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळवित आहे,सर्वजण स्वताच्या पायावर उभे आहोत,वडीलांची पूण्याई, त्याचे केलेले कष्ट याचा आम्हा भांवडाना सार्थ अभिमान वाटतो.
बाळासाहेब सस्ते,मूलगा

आमची आजी—आजोबा खूप कष्टाळू व प्रेमळ आहेत,कोणाला कधीली फसवू नका,संकटाला आत्मविश्वाने सामोरे हिच शिकवण आम्हाला दिली.

महेश सस्ते, प्रियांका सस्ते—उपप्रादेशिक परीवहन अधिकारी ,बारामती,मुंबई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!