माळशिरस तालुकाराजकिय

उत्तम जानकर यांच्या जातीच्या दाखल्याची सुनावणी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे

भूमीपुत्र न्यूज

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत दिवंगत आ. हनुमंत डोळस यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात एस एल पी (स्पेशल लिव पिटीशन) दाखल केल्यानंतर याची सुनावणी 17 फेब्रुवारी 2023 रोजी होणार होती परंतु ही सुनावणी तारीख पुढे 20 फेब्रुवारी 2023 रोजी ठेवण्यात आली होती यानुसार सोमवार 20 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली .

संकल्प डोळस

मा सर्वोच्च न्यायालयात संकल्प डोळस यांच्या वतीने सीनियर कौन्सिल मा श्री नागा मट्टू, माजी न्यायाधीश मद्रास हायकोर्ट व ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड मा श्री ॲड शिवाजीराव जाधव यांनी बाजू मांडल्यानंतर मा सर्वोच्च न्यायालयाने उत्तम जानकर यांच्या जातीच्या दाखल्याचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात रिॲडमिट करण्याचे निर्देश दिल्याने उत्तम जानकर यांच्या दाखल्याची सुनावणी मुंबई येथील उच्च न्यायालयात री अपील केल्यानंतर होणार असल्याची माहिती संकल्प डोळस यांनी भूमीपुत्र न्यूज शी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!