माळशिरस तालुकाशैक्षणिक

गिरझणी येथील धनशैल्य विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या शालेय टर्फ ग्राउंडचे उदघाटन

भूमीपुत्र न्यूज

धनशैल्य विद्यालय गिरझणी व किडझी अकलूज येथे भारताचा ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशभक्तीपूर्ण उपक्रमाने साजरा करण्यात आला.याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकलूज पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी कराटे,लाठी-काठी,शौर्य खेळ व मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याच कार्यक्रमात विद्यालयातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक टर्फ ग्राउंडचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.सोलापूर जिल्ह्यातील शाळांमधील हे पहिलेच टर्फ ग्राउंड असल्याचे नमूद करत प्रमुख पाहुण्यांनी विद्यालयाचे कौतुक केले.

या कार्यक्रमात रोटरी क्लब अकलूज,रोटरी क्लब सराटी डीलाईट व जैन सोशल ग्रुप, अकलूज यांच्या सदस्यांचा विद्यालयास विविध शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला.तसेच त्यानंतर ‘लिटिल आर्टिस्ट’ कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून झाली.


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मनिष गायकवाड यांनी केले. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!