माळशिरस तालुका पत्रकार संघ 2026 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न ,शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणजे पत्रकार / सुनीता पाटील

भूमीपुत्र न्यूज
काम करणारा माणूस चुकत असतो, प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करीत असताना अनावधानाने काही चुका होतात जाणीवपूर्वक चुका होत नाहीत परंतु चुका दाखविण्याचे काम पत्रकार निसंकोचपणे करतात पत्रकार आणि प्रशासन ही दोन चाके आहेत ही जर व्यवस्थित चालली तर निश्चितच समाजाच्या विकासात भर पडेल असे मत अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी व्यक्त केले माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन 2026 च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत त्या बोलत होत्या.

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी सलग पाच वर्षे मोफत सल्लागार म्हणून काम केल्याबद्दल माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभ्यासू व्यक्तिमत्व,जेष्ठ विधीज्ञ आदरणीय ॲड जी पी कदम साहेब यांचा आज तहसील कार्यालय माळशिरस येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मा सुनीता पाटील मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी विचारपीठावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूजचे अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी, श्रीमती ए आर ससाने, सा बां विभाग अधिकारी गोविंद कर्णवर पाटील ,निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, माळशिरस पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे,अकलूज पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, वेळापूर पोलीस स्टेशनचे एपीआय भाऊसाहेब गोसावी, नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय महारुद्र परजने, माळशिरस च्या सहाय्यक दुय्यम निबंधक रूपाली कदम , सहाय्यक,महसूल अधिकारी संदीप कोळेकर,पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेटे,पुरवठा निरीक्षक श्रीमती सुप्रिया वजाळे ,वनविभागाचे धर्मेंद्र सावंत,विजय काळे ,पंचायत समिती बांधकाम विभागाचे इस्माईल मुलाणी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पत्रकार निनाद पाटील यांनी प्रास्ताविक करून सर्व उपस्थित अधिकारी व मान्यवरांचे स्वागत केले व माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने गेल्या सहा वर्षात आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली यावेळी पीआय विकास दिंडोरे ,पीआय नीरज उबाळे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले ,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, श्रीमती ए आर ससाने, नायब तहसीलदार अमोल कदम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक,लेखक,कवी हनुमंत पवार, सामाजिक कार्यकर्ते गोरख जानकर व अजित बोरकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.उपस्थित अधिकारी वर्गाचा सन्मान माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश माने देशमुख तर आभार निनाद पाटील यांनी मानले.


कार्यक्रमासाठी बाळासाहेब वावरे, दत्ताजीराव मगर,बाळासाहेब सरगर, श्रीनिवास कदम पाटील, जयकुमार केचे पाटील,सचिन गायकवाड, सतीश दडस ,अजिनाथ देशमुख ,बापूसाहेब वाघमोडे ,प्रकाश काशीद आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज राऊत ,उपाध्यक्ष एल डी वाघमोडे ,दिनेश माने देशमुख ,सचिव उदय कदम ,सहसचिव अभिजीत जाधव, खजिनदार सतिश पारसे, निनाद पाटील, विनोद बाबर ,संजय देशमुख, संजय पवार, नितीन मगर,ओंकार आडत, शाहरुख मुलाणी आदी मान्यवर, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















