मनोज जरांगे पाटील यांच्या सभेवरून परत येताना माणकी ता माळशिरस येथीलमराठा युवक हनुमंत रणनवरे यांचे बीड जवळ अपघाती निधन
भूमीपुत्र न्यूज
माणकी ता माळशिरस येथील मराठा युवक हनुमंत रणनवरे वय वर्षे 48 यांचे रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी दुपारी 1 च्या सुमारास बीड जवळ अपघाती निधन झाले असून त्याच्या निधनाची बातमी समजतात संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे हनुमंत रणनावरे हे शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी आपले सहकार्य मित्र मोहन मुरलीधर रणनवरे यांच्या समवेत अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आले होते.
मनोज जरांगे पाटील यांची महासंवाद सभा संपल्यानंतर हनुमंत रणनवरे हे आपल्या मित्रासह दुचाकीवरून घराकडे परत येत असताना बीड जवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातात ते जागीच ठार झाले आहेत त्यांचे सहकारी मित्र मोहन मुरलीधर रणनवरे हे जखमी झाले आहेत त्यांच्या अपघाताची बातमी समजतात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शोक व्यक्त केला असून त्यांचे पार्थिव माणकी ता माळशिरस जि सोलापूर कडे शवविच्छेदनानंतर रवाना केले जाणार आहे
हनुमंत रणनवरे यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, आई,वडील असा परिवार आहे
भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली