माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

घाडगे कुटुंबीयांचा आदर्श , वाढदिवस साजरा केला वृद्धाश्रमातील ज्येष्ठासमवेत

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथील शुभांगी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आणि सविता झेरॉक्स चे संस्थापक अध्यक्ष ज्योतीराम घाडगे यांचा 15 मार्च वाढदिवस, वाढदिवसानिमित्त मित्रमंडळींना गोळा करणे ,भले मोठे केक आणणे, हार – तुरे ,फेटे व केक तोंडाला लावून अन्नाचे नासाडी करणे या अलीकडच्या काळातील अनिष्ट रूढींना फाटा देत ज्योतीराम घाडगे कुटुंबीयांनी त्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम बाभुळगाव, टेंभुर्णी येथे ज्येष्ठांना मिष्ठांन्न भोजन देत उत्साहात साजरा करण्यात आला.

घाडगे कुटुंबीयांनी वृद्धाश्रमातील अबाल वृद्धांना पुरणपोळीचे जेवण तर दिलेच याचबरोबर जीवनावश्यक वस्तूमध्ये रोजच्या वापरातील साबण, कपडे , पेस्ट ,ब्रश , पिण्यासाठी पाणी बॉटल , तेल, बिस्कीट, केक आदी जीवनावश्यक वस्तू दिल्या वृद्धाश्रमाला पुढील 5 ते 6 महिने पुरेल एवढे 6 क्विंटल गहू ,2 क्विंटल ज्वारी, 1 क्विंटल साखर, 1 क्विंटल तांदूळ, 1 क्विंटल तूर डाळ असा जीवनावश्यक किराणामाल दिला याचबरोबर आश्रमाच्या समोर 30 फूट रुंद आणि 120 फूट लांब ब्लॉक फरशी टाकण्यासाठी रोख रक्कम दिली , आश्रमासाठी लोखंडी कमान व रस्ता तयार करण्यासाठी मदत देणार असल्याचे यावेळी सांगीतले अशा या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची चर्चा होत असून घाडगे कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!