एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी….माळशिरस तालुका तलाठी संघाचा स्तुत्य उपक्रम

भूमीपुत्र न्यूज
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसाने झोडपून काढले असून सोलापूर जिल्ह्यातील सिना नदीकाठच्या शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले असून बळीराजा अडचणीत आहे अशा वेळेस सामाजिक भान ठेवून माळशिरस तालुका तलाठी संघ व सर्व मंडल अधिकारी यांच्या वतीने सीना नदीकाठच्या पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सप्टेंबर 2025 च्या मासिक वेतनातून एक दिवसाचे वेतन आर्थिक मदत म्हणून बळीराजाला देण्याचा निर्णय घेतला असून या आशयाचे पत्र माळशिरस तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल घेरडे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या सहीनिशी माळशिरसच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.


माळशिरस तालुका तलाठी संघाने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचा घेतलेला निर्णय हा एक स्तुत्य उपक्रम असून समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून माळशिरस तालुका तलाठी संघ व सर्व मंडळ अधिकारी यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून इतरांनी देखील हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगाचा पोशिंदा अडचणीत असताना आपण मदत केली पाहिजे ही भावना ध्यानात ठेवून पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे असेही बोलले जात आहे .





