माळशिरस तालुका

प्रशासनाच्या लेखी पत्रानंतर अकलूज येथील खंडकरी शेतकऱ्यांचे साखळी उपोषण मागे

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर 14 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या सदाशिवनगर, श्रीपुर व शिवपुरी मळा याअंतर्गत 22 गावातील खंडकरी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात साखळी उपोषण सुरू केले होते हे उपोषण सलग चार दिवस सुरू होते या शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात शुक्रवार दिनांक 17 रोजी अकलूज येथे पुणे येथील शेती महामंडळाच्या अधिकारी श्रीमती आवळे ,अकलूज प्रांत अधिकारी ज्योती कदम यांसह शेती महामंडळाचे अधिकारी व खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे- पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांसह वंचित खंडकरी शेतकऱ्यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक तोडगा काढत लेखी पत्र देऊन खंडकरी शेतकऱ्यांना आश्वस्त केल्याने खंडकरी शेतकऱ्यांनी आपले साखळी उपोषण शुक्रवार दि 17 फेब्रुवारी रोजी मागे घेतले .

यावेळी प्रशासनाने एक महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निकाली काढू असे लेखी पत्र दिल्यानंतरच उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी बी, डी, पाटील ,माजी उपसभापती किशोर सुळ सोमनाथ पिसे, दत्ता भोसले, तुषार पाटील, व उपस्थित वंचित खंडकरी शेतकरी उपस्थित होते.

गेल्या 10 वर्षांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाकडे हेलपाटे मारत होते परंतु प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होते सरकारी काम आणि कायमच थांब यानुसार प्रशासनाने खंडकरी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते अखेर शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण करून पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा जाळला यानंतर प्रशासन गतिमान झाले आणि खंडकरी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना लेखी पत्र देऊन आश्वस्त केले लेखी पत्र दिल्यामुळे हे उपोषण थांबविण्यात आले आहे दिलेल्या कालावधीत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल .
ॲड सोमनाथ वाघमोडे, खंडकरी शेतकरी नेते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!