माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात महिलांनी सहभाग घ्यावा / डॉ प्रियांका शिंदे

भूमीपुत्र न्यूज

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात माळशिरस तालुक्यातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घ्यावा असे अवाहन माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रियांका शिंदे यांनी केले आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा हाच संकल्प भारत, हीच प्रेरणा या संकल्पनेतून स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाची सुरुवात झाली असून देशाच्या आरोग्य परिस्थितीत बदल व देशभरात समर्पित आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिरांच्या आयोजन करण्यात आले आहे .

आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचे उदघाटन व प्रधानमंत्री मातृवंदन योजने अंतर्गत मातृत्व लाभाचे आयोजन करण्यासाठी दि 17 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये निवडक आरोग्य संस्थांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ संतोष नवले व गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात सदर अभियानांतर्गत निवडक आरोग्य संस्थांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आठवड्यातून एक व उपकेंद्र स्तरावरून आठवड्यातून दोन असे एकूण 301 शिबिर आयोजित केली असून सदर शिबिरामध्ये महिलांसाठी विविध सेवा दिल्या जाणार आहेत.

यामध्ये महिलांची एनसीडी तपासणी ,उच्च रक्तदाब, मधुमेह तोंडाचा कर्करोग ,स्तनाचा कर्करोग, ग्रीवाचा कर्करोग तपासणी , क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुली व महिलांसाठी अशक्तपणाची तपासणी ,समुपदेशन सेवा , आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल, स्क्रीनिंग कार्ड वितरण , गर्भवती महिलांसाठी तपासणी , बालकांची लसीकरण सेवा , किशोरवयीन मुलीं साठी मासिक पाळी स्वच्छता व पोषण यावरती सत्रे , महिला स्वयंसेवी गट आणि पंचायत राज संस्थांच्या महिला प्रतिनिधी द्वारे तेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर मोहीम पोषण समुपदेशन व कल्याण सत्र रक्तदान शिबिर, पी एम जे वाय अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान कार्डची वाटप, निक्षय मित्र नोंदणी अवयव दान नोंदणी आदी सेवा व नोंदणी करण्यासाठी शिबिरे तालुक्यात आयोजित केल्याबद्दल ची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रियांका शिंदे यांनी दिली.

सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी अशा गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका यांनी योग्य नियोजन करून जास्तीत जास्त लाभ देण्याचा संकल्प केला असून सदर योजनेसाठी सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!