अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत

प्रकाश पाटील, राजकुमार पाटील, माणिक वाघमोडे ,डॉ. रामदास देशमुख ,शंकर देशमुख गटाचा माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलला पाठिंबा
भूमीपुत्र न्यूज
पाणीव ता माळशिरस येथील काँग्रेसचे माजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील , राष्ट्रवादीचे प्रांतिक नेते शंकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक वाघमोडे, माजी जि प सदस्य डॉ रामदास देशमुख अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीबाबत या नेत्यांच्या भूमिकेकडे तालुक्यातील सर्वांचेच लक्ष लागले होते परंतु बुधवार दिनांक 26 एप्रिल रोजी माळशिरस येथे प्रकाश पाटील व त्यांच्या गटाची बैठक होऊन या गटाने सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनलच्या विरोधात लढणाऱ्या माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे .

मागील आठवड्यात या नेत्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतल्याने माळशिरस तालुक्यातील विरोधकांमधील दुही दिसून येत असून सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली होती असे चित्र तालुक्यात पहावयास मिळत होते परंतु माळशिरस तालुक्यातील या पारंपारिक विरोधकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने माळशिरस तालुक्यातील सत्ताधार्यांच्या विरोधात असणाऱ्या विरोधकांमध्ये पुन्हा एकदा समन्वयाचा अभाव दिसून आला आहे रविवार दि 23 एप्रिल रोजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या श्रीराम शिक्षण संस्थेवर दुपारी 1 .00 वा झालेल्या बैठकीत माळशिरस तालुक्यातील नेतेमंडळींसह पूर्व भागातील मतदार, कार्यकर्ते, नेते उपस्थित होते या बैठकीत येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने या नेत्यांच्या वेट अँड वॉच भूमिकेचा नेमका कोणाला फायदा व नेमका कोणाला तोटा होतो याबाबत राजकीय विश्लेषकामधून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत .
परंतु बुधवार दिनांक 26 एप्रिल रोजी माळशिरस येथे झालेल्या बैठकीत या नेत्यांनी सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल विरोधात लढणाऱ्या माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलला पाठिंबा जाहीर केल्याने माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच पॅनलचे पारडे जड झाले असून माळशिरस तालुक्यात सत्ताधारी मोहिते पाटील गटाविरोधात प्रथमच मोहिते पाटील यांचे सर्व विरोधक एकत्र आले असून बाजार समितीतील निवडणुकीत याचे परिणाम दिसतील असेही राजकीय विश्लेषकातून बोलले जात आहे माळशिरस येथे झालेल्या या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, प्रकाश पाटील ,राजकुमार पाटील ,के के पाटील, डॉ रामदास देशमुख, शंकर देशमुख ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक वाघमोडे, ॲड आप्पासाहेब वाघमोडे, ॲड सोमनाथ वाघमोडे ,गौतम माने, युवराज झंजे, दत्ता मगर आदी मान्यवर उपस्थित होते.
मी आमदारकीसाठी इच्छुक…
माझ्या गतीमुळे ,दोषामुळे अथवा अहंभावामुळे माझ्याकडून अनावधानाने अथवा जाणून-बुजून चुका झाल्याने माझे सहकारी माझ्यापासून दुरावले होते परंतु गेल्या पाच वर्षात याचे अनेक चटके मलाही बसले याचबरोबर माझ्या विरोधकांनाही अनेक वेदना झाल्या माझ्या या चुकांबाबत मी दिलगिरी व्यक्त करत असून यापुढे सगळे एकोप्याने काम करू व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत जे काही निर्णय घ्यावयाचे आहेत ते तुम्ही घ्या मी फक्त आमदारकीसाठी इच्छुक आहे विधानसभेला मला मदत करा
उत्तम जानकर, राष्ट्रवादी नेते




