माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा
प्रभू श्रीरामचंद्र सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्षपदी डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील तर उपाध्यक्षपदी आण्णासाहेब शिंदे

भूमीपुत्र न्यूज
अकलूज ता.माळशिरस येथील प्रभु श्रीरामचंद्र सार्वजनिक मंडळ अकलूज या संस्थेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली या संस्थेच्या अध्यक्षपदी जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी बिजवडी गावचे माजी सरपंच आण्णासाहेब शिंदे नियुक्त झाले.

संस्थेच्या सदस्यपदी पद्मजादेवी मोहिते-पाटील, मानसिंह भोसले,धनश्रीताई घुले-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील,माणिकराव मिसाळ,दिपक सुत्रावे, मल्लिकार्जुन वैद्य देशमुख, नितीन शिंदे,शेखर शेंडे यांची निवड करण्यात आली.
या संस्थेअंतर्गत श्रीराम मंदीर व भक्त निवास समाविष्ट आहेत यासह वर्षभर परिसरातील भाविक भक्त व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक रामदास रणवरे यांनी दिली.




