Uncategorized

65 वर्ष पूर्ण झालेल्या चालकांना सन्मान निधी योजनेचा लाभ प्रदान

भूमीपुत्र न्यूज

महाराष्ट्र शासनाने प्रवासी वाहतुकीची सेवा देणाऱ्या चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळाचे सभासद असलेल्या आणि 01 जानेवारी 2026 रोजी वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या अकलूज उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दोन चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत रुपये दहा हजार इतके सानुग्रह अनुदान थेट खात्यात जमा करण्यात आले आहे.

अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुढाकाराने सभासद नोंदणी झालेल्या शिवाजी कृष्णात चव्हाण, मधुकर पांडुरंग पोरे या ज्येष्ठ चालकांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. 17 सप्टेंबर चालक दिनाचे औचित्य साधून या दोन जेष्ठ सन्माननीय चालकांचा अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे, अश्विनकुमार पोंदकुले, भाग्यश्री शेंडे, स मो वा नी शिवाजी लाळगे व इतर उपस्थित होते .प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या चालकांनी कल्याणकारी मंडळा अंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी करून मंडळाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या योजनांचा संपूर्ण लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!