Uncategorized

स्थानिक युवकांनी केलेला व्यवसाय शेतकऱ्यांना बळ देईल/ नितीन सावंत

कोळेगांव येथे अक्षय फ्रुट्स अँड सप्लायर्स या व्यवसायाचा शुभारंभ

भूमीपुत्र न्यूज

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी पुरवठादार यांची मोलाची भूमिका असते.कोळेगांव येथे अनेक शेतकरी,केळी,पेरू,डाळींब सारख्या फळबागांची लागवड करीत असून त्यांच्या पिकाला अक्षय दुपडे यांनी सुरू केलेला नवीन व्यवसाय योग्य भाव मिळवून देईल असे मत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोळेगांव विकास सोसायटीचे चेअरमन नितीन सावंत यांनी व्यक्त केले.


कोळेगांव ता माळशिरस येथील युवक अक्षय दुपडे याने अक्षय फ्रुट सप्लायर्स या नवीन व्यवसायाची सुरवात केली असुन त्याचे उदघाटन माजी सभापती डॉ.रवींद्र बेंदगुडे,वैभव मोरे, नितीन सावंत ,सुनील सावंत तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना सदगुरू श्री श्री साखर कारखान्याचे कृषी अधिकारी सुनील सावंत म्हणाले की शेतकरी मोठ्या कष्टाने आपली शेती पिकवत असतो व शेतीबरोबर डाळिंब केळी पेरू ही पिके जास्त प्रमाणात घेतली जात आहेत गावातील युवकाने आता हा व्यवसाय सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही, परंतु व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना मानसिक त्रास होईल असे कोणतेही काम न करता शेतमालाचा योग्य भाव करून वेळेवर पैसे द्यावेत.

या कार्यक्रमासाठी वैभव मोरे,डॉ रवींद्र बेंदगुडे, नितीन सावंत,संग्राम दुपडे प्रसाद दुपडे,नागेश दुपडे,संपत भोसले,राजेंद्र सावंत, सुनील बेंदगुडे,आबासाहेब दुपडे,राहुल आवताडे,कल्याण दुपडे, तानाजी भोसले,राहुल सावंत,नामदेव सावंत,गणेश माने,सचिन माने,स्वप्नील पवार,सोमनाथ दुपडे, गणेश दुपडे प्रसाद दुपडे ,लखन दुपडे,प्रवीण दुपडे,दत्तात्रेय दुपडे नवनाथ दुपडे,नितीन कपने,सागर खांडेकर,शहाजी भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतीला जोडधंदा म्हणून मी हा व्यवसाय सुरू केला असून शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले डाळिंब, केळी, पपई पेरू योग्य किमतीत खरेदी करून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देईन.

अक्षय दुपडे, फ्रुट सप्लायर्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!