जेईई ॲडव्हान्स परीक्षेत माळशिरसच्या ‘कोहिनूर फाउंडेशन’चा डंका; प्रथमेश जमदाडेचे दैदिप्यमान यश

भूमीपुत्र न्यूज
देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या ‘जेईई ॲडव्हान्स’ (JEE Advanced) परीक्षेत माळशिरस येथील ‘कोहिनूर फाउंडेशन’च्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचा विद्यार्थी प्रथमेश मंजू अवधूत जमदाडे याने माळशिरसमध्येच राहून अभ्यास करत या परीक्षेत यश मिळवले आहे.प्रथमेशने जेईई ॲडव्हान्स परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) ७८२९ आणि सेंट्रल ओबीसी कॅटेगरी रँक १८०३ मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या खडतर परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना प्रथमेशने याचे श्रेय आई वडील व प्रा. अमोल चोरमले सर आणि कोहिनूर फाउंडेशनच्या संपूर्ण टीमला दिले आहे. त्यांच्या योग्य आणि अचूक मार्गदर्शनामुळेच हे यश प्राप्त करता आल्याचे त्याने आवर्जून सांगितले .
या यशाबद्दल प्रथमेशवर आणि कोहिनूर फाउंडेशनच्या टीमवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.




