उत्तम जानकर यांच्या दाखल्यावर 20 फेब्रुवारी 2023 रोजी सुनावणी
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम शिवदास जानकर यांच्या हिंदू- खाटीक या जातीच्या दाखल्यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती संकल्प डोळस यांनी भूमिपुत्र न्यूज शी बोलताना दिली शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी या दाखल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती परंतु ही सुनावणी सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
उत्तम जानकर यांनी बनावट कागदपत्रे सादर करून सन 2007 साली हिंदू- खाटीक हा जातीचा दाखला काढला आहे अशी तक्रार तत्कालीन आ हनुमंत डोळस यांनी केली होती यानंतर उत्तम जानकर यांनी सन 2009 ची विधानसभा याच दाखल्याच्या आधारे लढविली होती सन 2014 ची विधानसभा निवडणूक लढवीत असताना छाननीत पुन्हा उत्तम जानकर यांचा अर्ज बाद झाला यानंतर उत्तम जानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन हा दाखला मंजूर करून घेतला व सन 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली दरम्यान आ हनुमंत डोळस यांचे निधन झाले यानंतर त्यांचे सुपुत्र संकल्प हनुमंतराव डोळस यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाद मागितली असून यावर गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी सुनावणी होणार होती परंतु ही तारीख पुढे जाऊन सोमवार दि 20 फेब्रुवारी 2023 रोजी दोन न्यायाधीशांच्या समोर या दाखल्याची सत्यता सुनावणी होणार आहे अशी माहिती दिवंगत आ हनुमंत डोळस यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी दिली .