माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

माणकी येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ”उदघाटन संपन्न

युवा पिढी व जेष्ठ नागरिक यांच्या विचारातून गावाचा विकास सुरू आहे

भूमीपुत्र न्यूज

माळशिरस तालुक्यातील माणकी येथे लोक सहभागातून भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले त्याचे उद्घाटन गुढी पडव्याचा शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जशी घराला शोभा अंगणातल्या तुळशी वृंदावनाने वाढते तसेच गावची शोभा त्याच्या प्रवेशद्वाराने वाढते गुढी पडव्याचा शुभमुहूर्तावर माणकी गावाला एक अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. गावकऱ्यांच्या सहभागातून व लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशकमानीचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

या प्रवेशद्वाराला बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छ. शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.ही प्रवेशकमान केवळ एक वास्तू नसून,ती गावाच्या एकात्मतेची,संस्कृतीचे आणि इतिहासाप्रती असलेल्या आदराचे प्रतीक आहे.गावातील प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून ही उभारणी शक्य झाली आहे,त्यामुळे ही कमान आपली सर्वांचीच आहे.या उपक्रमामुळे गावात एकोपा असल्याचे दर्शन घडते.डॉ शिरीष रणनवरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य गौतम माने,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.रामदास देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण पवार ,बाबा माने , यशराज देशमुख हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट रणनवरे यांनी केले तर शिवामृत दुध उत्पादक संघाचे संचालक संग्रामसिंह रणनवरे यांनी या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली.

माणकी हे गाव म्हणजे सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मिकतेचे प्रतिक आहे.या गावाचा विकासाच्या संकल्पना सर्वांच्या सहमतीने व विचाराने होतात. गावातील सर्वांच्या एकीमुळे विकासाची चढती कमान वाढत आहे लोकवर्गणीतून भव्य प्रवेशद्वार उभारून गावात येणाऱ्याचे स्वागत होणार आहे भविष्यातही अजून नवनवीन संकल्पना राबविणार

संग्रामसिंह रणनवरे -ग्रामस्थ व संचालक,शिवामृत दुध उत्पादक संघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!