माळशिरस तालुका

अज्ञात मोटरसायकल स्वाराच्या चुकीने बचेरीच्या श्रद्धा पाटील चा अपघाती मृत्यू

भूमीपुत्र न्यूज

बचेरी ता माळशिरस येथील श्रद्धा पाटील वय वर्ष 21 नुकतच डी फार्मसी चे शिक्षण पूर्ण झालं होतं… ट्रेनिंग साठी पिलीव च्या डॉ. खरात यांच्या शिवरत्न मेडिकलमध्ये प्रशिक्षणाचं धडे घेत होती वडील रमेश शिवदास पाटील व्यवसाय शेती आपल्या मुलीला म्हणजेच श्रद्धाला रोज सकाळी 10 वा बचेरी हून पिलीवला ने आण करीत होते नेहमीप्रमाणे गुरुवार दि 2 फेब्रुवारी सकाळी 10 वा आपल्या मुलीला बचेरी हून घेऊन पिलीवला सोडण्यासाठी जात असताना सकाळी 10.30 च्या सुमारास पिलीव येथील शिक्षक कॉलनी शेजारी समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना पिलीव बाजू कडून एक मोटरसायकल अती भरघाव वेगाने येऊन रमेश पाटील यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने रमेश पाटील गाडीवरून खाली पडले मात्र श्रद्धा पाटील आणि मोटरसायकल समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या खाली गेले.

हे पाहताच ट्रॅक्टर ड्रायव्हरने ट्रॅक्टर थांबविला या ठिकाणाहून जाणारे डॉ शिकारे यांच्या मदतीने श्रद्धा पाटील या जखमी मुलीस पिलीव येथील डॉ गुळभिले यांच्या हॉस्पिटलमध्ये तात्काळ नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेण्यास सांगितले परंतु श्रद्धा ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली गेल्याने इतकी जखमी झाली होती की अकलूज पर्यंत पोहोचेपर्यंतच तिने आपला प्राण सोडला होता यामुळे एका तरुण सुशिक्षित मुलीला मोटरसायकल स्वराच्या हायगईने आपले प्राण गमवावे लागले आहेत याबाबत श्रद्धाच्या वडिलांनी पिलीव पोलीस चौकी या ठिकाणी रीतसर फिर्याद दाखल केली आहे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत

माणुसकी हरवली
एका मोटार सायकल चा आपल्या चुकीने अपघात झाला आहे, तरुणी जीवाच्या आकांताने टाहो फोडत आहे हे डोळ्या देखत दिसत असतानाही अज्ञात मोटरसायकल स्वाराने या ठिकाणी न थांबता, कोणतीही मदत न करता तसेच पुढे निघून जाणे हे कितपत योग्य आहे ? याबाबत सोशल मीडियावर तीव्र भावना व्यक्त केल्या जात असून खरंच माणुसकी हरवली आहे का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे अशा मोटार सायकल स्वारास कठोर शासन व्हावे अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!