कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा संपन्न
भूमीपुत्र न्यूज / केदार लोहकरे
कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चार दिवसीय शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा पार पडली.नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील सुप्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार संतोष नागवंशी यांनी 18 ते 21 जानेवारी 2023 दरम्यानच्या कार्यशाळेत कृतियुक्त मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील होते.यावेळी विभाग प्रमुख प्रा.अजित लोकरे उपस्थित होते.
यावेळी 12 जानेवारीला घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्राजक्ता दिलीप पाटील,सुस्मिता गणपती इंगवले आणि मानसी माणिक जाधव यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यशाळेला श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ.जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नागवंशी यांनी शैक्षणिक साधनाचा अध्यापनातील उपयोग स्पष्ट केला.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी शिक्षकांनी शैक्षणिक साधने वर्गात कशी वापरावीत,याची माहिती दिली समारोपप्रसंगी प्रदीप कांबळे,जयश्री पाटील,ओंकार जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.प्राजक्ता दिलीप पाटील यांनी स्वागत केले. विभाग प्रमुख प्रा.अजित गोपाळराव लोकरे यांनी आभार मानले.