माळशिरस तालुका

कोळेगांव येथे विघ्न संतोषी व्यक्तीकडून शेती व पत्रा शेडचे नुकसान

अज्ञात इसमांविरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भूमीपुत्र न्यूज

कोळेगाव ता. माळशिरस येथे विघ्न संतोषी अपप्रवृत्तीने शाहरुख पिरसाहेब मुलाणी यांच्या शेतातील पेरूच्या बागेचे नुकसान करून शेतातील पत्रा शेड वर दगड टाकून पत्रा शेड फोडून नुकसान केल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी यांची सांगोला-अकलूज रोड लगत शेत जमीन असून गट नं 1213 मध्ये 12 गुंठे शेतात 30 बाय 40 आकाराचे सिमेंटचे पत्रा असलेले पोल्ट्री व्यवसायासाठी केलेले शेड आहे.त्याचबरोबर शेतात पेरू पिकाचे तीन वर्षाची 50 झाडे आहेत.सदर झाडांवर पेरू लागलेले आहेत.अज्ञात इसमांकडून वारंवार आर्थिक नुकसान व्हावे या हेतूने लागलेले पेरू तोडून चोरून घेऊन जात आहेत .त्याचबरोबर पोल्ट्री व्यवसायासाठी केलेल्या शेडवर दगड टाकून पत्रा फोडलेला आहे. तसेच शेतातील एक वर्षाचे बांदा लगत असलेले शेवग्याचे झाड तोडून नुकसान केले आहे.

सदरचे शेत हे घरापासून लांब असल्याचे ओळखून हा अज्ञात व्यक्ती सातत्याने पेरूच्या बागेचे व पत्रा शेडचे नुकसान करीत आहे अशी तक्रार शाहरुख मुलाणी यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.याचा अधिक तपास वेळापूर पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मच्छिंद्र राजगे करीत आहेत.

सातत्याने माझ्या शेतात अज्ञात व्यक्तीकडून नुकसान केले जात आहे परंतु बऱ्याच वेळा किरकोळ घटना समजून आम्ही तक्रार केली नाही, परंतु आता वारंवार या घटना घडत असल्याने सदर अज्ञात इसम याचा फायदा घेऊन सातत्याने नुकसान करीत आहे वेळापूर पोलिसांनी तात्काळ याचा बंदोबस्त करावा व माझ्या कुटुंबाला होणारा त्रास कमी करावा.

शाहरुख मुलाणी, शेतकरी व उपाध्यक्ष माळशिरस तालुका पत्रकार संघ

शाहरुख मुलाणी यांनी वेळापूर पोलिसात त्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे.यानुसार वेळापूर पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.अशा नुकसान व त्रास देणाऱ्या व्यक्तीस लवकरच जेरबंद करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल व यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.
निलेश बागाव सहाय्यक पोलीस निरीक्षक वेळापूर पोलीस स्टेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!