मुंबईच्या व्यापाऱ्याला काळी हळद भोवली 64 लाखाची फसवणूक करणारे आरोपी अकलूज पोलिसांनी केले गजाआड

भूमीपुत्र न्यूज
अकलूज शहरांमध्ये काही लोक काळी हळदीमुळे चुंबकीय क्षेत्र (रेडिएशन) निर्माण होऊन या आधारे बरीच कृत्य करता येतात असे भासवून सदर काळया हळदीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशी बतावणी करून लक्ष्मण धनजी सेंगाणे वय वर्ष 73, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करणाऱ्या मुंबईच्या व्यापाऱ्याला अकलूज मध्ये त्याचे कडून वेळोवेळी 64 लाख 45 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद लक्ष्मण सेंगाणे यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे गुरुवारी पहाटे एक वाजून पंधरा मिनिटांनी केले असता 6 आरोपींना अकलूज पोलिसांनी तात्काळ अटक करून गजाआड केले .

फसवणूक करणारे आरोपी काशिनाथ पाटील जांभीवली ता भिवंडी जि ठाणे, योगेश दावले संग्राम नगर अकलूज, हेमंत काटे आकुर्डी पुणे, अतुल ताम्हणे कळवा ठाणे, अवधूत शाबासकर मुंब्रा ठाणे, मच्छिंद्र डोंगरे अंबरनाथ वेस्ट कल्याण यांना अकलूज पोलिसांनी सिताफिने अटक करून गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट कार ,टोयाटो इनोव्हा कार यासह काळी हळद सदृश्यपदार्थ अँटी रेडिएशन स्प्रे व अँटी रेडिएशन किट आणि अँटी रेडिएशन बॉक्स अशा भासवलेल्या वस्तू व तपासणी सिलेंडर आदी साहित्य हस्तगत केलेले आहे.

सदरची कामगिरी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे ,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, रामचंद्र चौधरी ,विक्रम घाटगे, शिवकुमार मदभावी ,चालक रविराज नागरगोजे ,अजित कडाळे ,श्रीकांत निकम यांनी ही कामगिरी केली आहे गुन्ह्याचा तपास अकलूजचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड करीत आहेत
.
अकलूज पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी नुकताच अकलूज पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार घेतल्यानंतर आपल्या कार्यकाळातील सुरुवातीच्या दोन दिवसातच तक्रार दाखल होताच अवघ्या अर्ध्या तासात सदर आरोपींना शिताफीने अटक करून त्यांच्या मूसक्या आवळल्याने अकलूज आणि परिसरातील बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर जरब बसली आहे यामुळे अकलूज पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे .




