माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

भाजप व आठवडी बाजार करांच्या पाठपुराव्याला यश; अकलूजमधील प्रभाग क्रमांक ८ मध्ये हायमास्ट लाईट उभारणीस सुरुवात

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथील प्रभाग क्रमांक ८ मधील नवीन बाजारतळ परिसरात हायमास्ट लाईट बसविण्याच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. भाजप आणि स्थानिक आठवडी बाजार करांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने याची दखल घेतली असून, यामुळे या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.​

७ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरसेवक महेश लक्ष्मी केशव शिंदे यांनी अकलूज नगर परिषदेकडे ई-मेलद्वारे निवेदन सादर करून प्रभागातील आवश्यक ठिकाणी हायमास्ट पोल उभारण्याची मागणी केली होती.​नागरिकांची त्रासातून सुटका होणार​नवीन बाजारतळ परिसरात रात्रीच्या वेळी दारुड्यांचा वावर वाढला होता. यामुळे स्थानिक नागरिक, महिला तसेच बाजारातील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत होता. सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने येथील नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. या तक्रारींची आणि लोकप्रतिनिधींच्या निवेदनाची दखल घेत अकलूज नगर परिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आणि तातडीने हायमास्ट लाईट बसविण्याच्या कामाला प्रारंभ केला.​

“नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत. नवीन बाजारतळ परिसरातील हायमास्ट लाईटमुळे महिला आणि व्यापाऱ्यांची सुरक्षा वाढेल. भविष्यातही प्रभागातील विकासकामांना आमचे नेहमीच प्राधान्य राहील.

“महेश लक्ष्मी केशव शिंदे (नगरसेवक)

या कामाची सुरुवात झाल्यानंतर नगरसेवक महेश शिंदे यांनी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच संबंधित विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.​यावेळी प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका सौ. दिपाली संतोष वाघमोडे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगत त्यांनी नगर परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले. हायमास्ट लाईटच्या उभारणीमुळे नवीन बाजारतळ परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!