आंतरराष्ट्रीयदेश-विदेशसोलापूर जिल्हा

इराण-इराक येथील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

भूमीपुत्र न्यूज

इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इराक येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इराक येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.सदर बाबीची नोंद घेऊन नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :• जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर नियंत्रण कक्ष : 0217-2731012 • सोलापूर पोलीस शहर नियंत्रण कक्ष : 0217 – 2744600 / 2744620,• सोलापूर पोलिस ग्रामीण नियत्रंण कक्ष: 0217- 2732000• मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321590561

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!