क्रीडामाळशिरस तालुका

जागतिक महिला दिनानिमित्त अकलूज रोटरी क्लब च्या वतीने महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भूमीपुत्र न्यूज

रोटरी क्लब अकलूजच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा स्पर्धेचा रोमांचक सोहळा मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर यांच्या सहकार्याने माळीनगर क्रीडांगणावर पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका महाडिक यांच्या हस्ते झाले.

यावेळी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, माळीनगरचे होलटाईम डायरेक्टर गणेश इनामके, संचालक अशोक गिरमे, माळीनगर ग्रामपंचायतच्या सरपंच अनुपमा एकतपुरे, सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार ज्योती लांडगे उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये परिसरातील महिला संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे पंच म्हणून आनंद पावशे, मनजीत नवले, बाळासाहेब रनवरे यांनी काम पाहिले. स्पर्धेतील अंतिम सामना अतिशय चुरशीचा ठरला. पारितोषिक वितरण डॉ मानसी इनामदार ,डॉ. रेवती राणे याच्या हस्ते करण्यात आले. शिवरत्न क्रिकेट अकॅडमी, विजेता संघ उपाय अकलूज आणि उपविजेता संघ – अहिल्यादेवी होळकर एसएम कॉलेज, माळेवाडी ठरला विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक व रोख पारितोषिके रो. हेमलता मुळीक व रो. आशा शेख यांच्या सौजन्याने पारितोषिके प्रदान करण्यात आली तसेच तृतीय क्रमांक – डॉक्टर्स इलेव्हन, अकलूज आणि उत्तेजनार्थ पुरस्कार – सावित्रीबाई फुले एसएम कॉलेज, माळेवाडी यांनाही करंडक देऊन गौरवण्यात आले.

प्रत्येक सामन्यासाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीर असे वैयक्तिक पुरस्कारही रो. बबनराव शेंडगे, शेंडगे कन्स्ट्रक्शन यांच्या सौजन्याने देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान, जिजाऊ ब्रिगेड सोलापूरच्या अध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड यांनी सर्व महिला खेळाडूंना गुलाब पुष्प आणि पुस्तक भेट देऊन सन्मानित केले. या स्पर्धेचे आयोजन रोटरी क्लब अकलूज तर्फे करण्यात आले. तर यासाठी न्यू अंजनीया डिस्ट्रीब्युटर्स, अभय मेडिकल आणि गंगा ज्वेलर्स यांचे प्रायोजकत्व लाभले, कार्यक्रमाचे नियोजन, रो. आशा शेख, रो. हेमलता मुळीक, रो. अजिंक्य जाधव, रो. कल्पेश पांढरे, रो. केतन बोरावके, रो. स्वप्निल शहा, रो. रुजल दोभाडा, रो. तृप्ती कुदळे, रो. आणि अध्यक्ष रो. प्रिया नागणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव रो. मनिष गायकवाड यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!