पै सिकंदर शेख माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या फेसबुक पेज वर रविवार दि 19 मार्च रोजी दुपारी 02.15 वा

भूमीपुत्र न्यूज
संपूर्ण देशभरात आपल्या कुस्तीने धुमाकूळ घालणारा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील नामांकित मल्ल पै सिकंदर शेख हा माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या फेसबुक पेजवर लाईव्ह मुलाखतीसाठी रविवार दि 19 मार्च रोजी दुपारी 02:15 वाजता येणार आहे तरी तमाम कुस्ती शौकिनांनी ही मुलाखत माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहून आपलेही प्रश्न विचारावेत असे आवाहन माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केले आहे.
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने या अगोदरही कला, क्रीडा, कृषी, वैद्यकीय, राजकीय आदी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेऊन अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून रविवारी पै सिकंदर शेख यांची मुलाखत पुणे या ठिकाणी होत असून ही मुलाखत माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या फेसबुक पेजवर लाईव्ह स्वरूपात दिसणार आहे . कुस्ती या विषयावर पै सिकंदर शेख व सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक युवराज केचे हे पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे यावेळी देणार आहेत यामुळे ही मुलाखत सर्वांनी पहावी असे आवाहन करण्यात आले आहे .




