कृषीसोलापूर जिल्हा

मोहोळ येथे रविवारी कृषी विभाग व महादेश अंतर्गत आंबा कार्यशाळा

भूमीपुत्र न्यूज

मोहोळ येथील घाटूळे मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर व महादेश फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि 23 जुलै सकाळी रोजी सकाळी 11.00 वा सघन आंबा लागवड , वर्षभर घ्यावयाची काळजी, पाणी व्यवस्थापन आदी विषयावर आंबा कार्यशाळा आयोजित केली आहे तरी सर्व आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहोळ तालुका कृषी विभाग व महादेश फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

फळांचा राजा म्हणून आंब्याला संबोधलं जातं पश्चिम महाराष्ट्रातील केशर आंबा हा जगभर प्रसिद्ध असून नुकताच आंब्याचा काढणी हंगाम संपला आहे मोहोळ तालुक्यात व आसपासच्या परिसरातील आंबा लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले असून याचबरोबर नव्यानेच लागवड केलेल्या व जुन्या आंबा उत्पादकांच्या अडचणी व शेतकऱ्यांना आंबा फळ पिकाचे काढणीनंतर वर्षभर व्यवस्थापन कसे करावयाचे ? आंब्याला देण्यात येणारे कल्टर ॲप्लीकेशन कशा पद्धतीने करावयाचे ? दरवर्षी आंबा काढणीनंतर आंबा बागेची छाटणी करावयाची का? करावयाची असेल तर ती कोणत्या पद्धतीने करावयाची ? याचे प्रात्यक्षिक, आंब्याला वर्षभर कराव्या लागणाऱ्या फवारण्या, देण्यात येणारी खते ,कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावयाचे यावर सखोल असे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे .

या कार्यशाळेसाठी कृषी विभागाच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने , प्रकल्प संचालक (आत्मा) मदन मुकणे, अतुल पवार , तानाजी वळकुंडे कृषी शास्त्रज्ञ मंजुनाथ पाटील उपस्थित राहणार असून व्याख्याते म्हणून आंबा महर्षी राजगोंडा पाटील व महादेश फार्मर प्रोडूसर कंपनीचे चेअरमन सचिन नलावडे, मार्गदर्शन करणार असून यावेळी तानाजी वाडीकर, विजय धुमाळ ,सचिन कुलकर्णी, संतोष कुरणे, धनाजी साठे , उन्मेश शिंदे हे उपस्थित राहणार आहेत ही कार्यशाळा वेळेवर सुरू होणार आहे तरी सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!