माळशिरस तालुकाराजकिय

​कोळेगांव ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध होणार ? राजकीय हालचालींना वेग​

भूमीपुत्र न्यूज

कोळेगांव ता माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच रजनी प्रसाद दुपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

कोळेगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2022झाली झाली होती. यामध्ये पारंपरिक विरोधी दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढले होते तर याविरोधात नवख्या कार्यकर्त्यांनी मोठ बांधत पॅनल लढवून 1000 च्या आसपास मतदान मिळवले होते. सत्ताधारी गटाच्या स्थानिक पातळीवर झालेल्या राजकीय तडजोडीनुसार तत्कालीन लोकनियुक्त सरपंच रजनी दुपडे यांनी सरपंचपदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुषमा धनंजय दुपडे यांना सरपंचपदाची संधी देण्यासाठी हा राजीनामा देण्यात आला होता.

नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करणे: ७ एप्रिल २०२६ ते १३ एप्रिल २०२६ (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत).​उमेदवारी अर्जांची छाननी: १५ एप्रिल २०२६ (बुधवार).​उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: १७ एप्रिल २०२६ (शुक्रवार, दुपारी ३ वाजेपर्यंत).​निवडणूक चिन्ह वाटप ​मतदानाचा दिनांक: २८ एप्रिल २०२६ (मंगळवार). सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत​मतमोजणी आणि निकाल: २९ एप्रिल २०२६ (बुधवार) निवडणूक कार्यक्रम आहे.​

जनतेतून सरपंच पदा बरोबर वार्ड क्रमांक 2 मधील सदस्य, सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होणारे नेतृत्व म्हणून परिचित असलेले किशोर सावंत पाटील यांच्या दुःखद निधनाने रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे.

सरपंच पदासाठी अश्विनी सावंत लढणार

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे चांगली मते मिळवली आहेत त्यामुळे भाजप पुरस्कृत पॅनल हे निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून अश्विनी सावंत या उमेदवार इच्छुक आहेत तशी त्यांनी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने सुरूवात केली तालुक्यातील वरिष्ठ नेते मंडळीच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजयी होऊन विकास कामे करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.

या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर जवळपास दीड वर्ष कामकाज करता येणार आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की ​इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता कोणती समीकरणे जुळतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जरी सरपंच पदासाठी सुषमा दुपडे यांचे नाव आघाडीवर असले, तरी निवडणूक प्रक्रिया नजिक आल्यावर इतर कोणते इच्छुक उमेदवार समोर येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!