महाराष्ट्रमाळशिरस तालुकाराजकियसामाजिकसोलापूर जिल्हा

मा आ रामभाऊ सातपुते यांच्या सूचनेनंतर अकलूज मटन मार्केट परिसरातील अस्वच्छतेवर तात्काळ कारवाई – नगरपरिषदेचा स्वच्छतेला प्रारंभ..

भूमीपुत्र न्यूज

अकलूजमध्ये अलीकडील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी शहरातील विविध भागांना भेट दिली. यादरम्यान अकलूज मटन मार्केट शेजारील परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. तत्काळ जनतेच्या समस्येची दखल घेत सातपुते यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे आदेश दिले.

सातपुते यांच्या सूचनेनंतर अकलूज नगरपरिषदेने त्वरित कारवाई करून परिसराची स्वच्छता केली.नागरिकांनी या जलद प्रतिसादाचे समाधान व्यक्त केले असून, “समस्या दिसताच उपाययोजना करणारे नेतृत्वच खरी जनसेवा करत आहे,” अशा शब्दांत लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

माजी आमदार राम सातपुते हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने गांभीर्याने दखल घेत आहेत याचाच परिपाक म्हणून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये अकलूज आणि परिसरात त्यांनी आवर्जून नुकसानीचा पाहणी दौरा अकलूज परिसरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत केला यावेळी त्यांना ठीक ठिकाणी अनेक समस्या दिसून आल्या,तात्काळ याची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणेला आदेश देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!