माळशिरस तालुकासामाजिक

घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाघोली येथे अंगणवाडींना साहित्याचे वाटप

भूमीपुत्र न्यूज

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाघोली ता. माळशिरस येथे वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने वाघोली गावातील सर्व अंगणवाड्यांना शालेय पोषण आहारासाठी स्वयंपाकाच्या साहित्याचे वाटप सरपंच वृषाली योगेश माने यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच वृषाली माने यांच्या हस्ते करण्यात आले.

15 व्या वित्त आयोगातून अंगणवाड्यांना शालेय पोषण आहारासाठी स्वयंपाकाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये रॅक, कुकर, कळशी,पातेली, बादली, स्टील पंप आदि साहित्यांचे वाटप करण्यात आले या साहित्य वाटपाबद्दल अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ग्रामपंचायतीचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी उपसरपंच कालिदास मिसाळ,योगेश माने, संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ ,भारत पाटोळे, मराठा सेवा संघाचे माळशिरस तालुका सचिव राजेंद्र मिसाळ ,अमोल मिसाळ, दत्ता गाडे, दत्तात्रय मिसाळ, बापूराव मिसाळ, ग्रामसेविका श्रीमती शिखरे, गणेश शेंडगे, मल्हारी जाधव, बलभीम ओहाळ ,मारुती मिसाळ ,दादासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!